सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला नारळाच्या होळीने झाली सुरुवात…
बुलडाणा, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलडाणा जिल्हातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीने झाली. दरवषी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्गावर चादर चढाविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चा केल्या जाते त्यांनतर होळीला पेटविली जाते या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण करतात.
ह्या होळी पूजनाच्या कार्यक्रमाला यात्रेसाठी आलेले भाविक उपस्थित असतात. नारळाची होळी पेटविल्यानंतर या यात्रा महोत्सवाला ख-या अर्थाने सुरुवात होते. सैलानी बाबाच्या दर्गावर माथा टेकणे आणि चादर चढविण्यासाठी महाराष्ट्रास विविध राज्यातील भाविक या यात्रा महोत्सवामध्ये सहभागी होत असतात. सैलानी बाबा यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला असून राज्यभरात विविध एसटी बस आगारतून या यात्रेसाठी विशेष बस सेवेची व्यवस्था ही करण्यात आली आहे .
ML/ML/SL
24 March 2024