अंधेरीतील साई मंदिराचा चौथा वर्धापन दिन

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अंधेरी पूर्व येथील श्रद्धा सबुरी साई ट्रस्टच्या श्री साई मंदिराचा चौथा वर्धापन दिन 5 ते 7 जानेवारी या कालावधीत
छ. शिवाजी महाराज संकुल, एमएमआरडीए कॉलनी, पूनमनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमात पालखी मिरवणूक, सत्यनारायणाची महापूजा ,
साई भंडारा सोबत नवयुग साई भजन मंडळ प्रस्तुत गजर साईनामाचा हा मराठी आणि हिंदी गीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रघुनाथ सावंत, सेक्रेटरी शैलेश शिंदे, खजिनदार प्रमोद देसाई आणि सल्लागार क्रृष्णा रोक्कम यांनी केले आहे.
ML/ML/PGB 26 dec 2024