साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी साहित्यिकांचा सन्मान

 साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी साहित्यिकांचा सन्मान

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : . विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी आज केली. साहित्य अकादमीच्या वतीने वर्ष 2024 साठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला असून शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील देविदास सौदागर यांची ‘उसवण’ कादंबरी युवा पुरस्काराची मानकरी ठरली आहे. सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे, किरण गुरव आणि श्रीकांत उम्रीकर यांच्या परीक्षक समितीने मराठी भाषेतील युवा पुरस्काराच्या साहित्यकृतीची निवड केली. या पुरस्कारांचं स्वरुप हे 50 हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असं असणार आहे. 

आज असामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्ऩड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषेतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. संस्कृत भाषेतील पुरस्कारांची घोषणा नंतर केली जाणार आहे.

SL/ML/SL

15 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *