कृष्णात खोत लिखित ‘रिंगाण’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य अकादमीकडून आज २४ भारतीय भाषांमधील विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुर येथील लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘रिंगाण’ या कादंबरीमध्ये कृष्णात खोत यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्काराचं वितरण १२ मार्च रोजी करण्यात येणार आहे.
कृष्णात खोत यांच्या यापूर्वी ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४) कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. तर, ‘नांगरल्याविन भुई’ (२०१७) हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी काही कथाही लिहिल्या आहेत.
SL/KA/SL
20 Dec. 2023