नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोदाकाठी सहस्त्र दीपप्रज्वलन

 नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोदाकाठी सहस्त्र दीपप्रज्वलन

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी नाशिककर देखील सज्ज झाले होते. नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड येथे हजारो नाशिककर एकत्रित झाले होते, यावेळी सहस्त्रदीप प्रज्वलीत करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवनेरी युवा मित्र मंडळाच्या वतीने गोदाकाठी हा सहस्रदीप प्रज्वलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तब्बल २०२४ दिवे प्रज्वलित करून नवीन वर्षाचे प्रसन्न आणि प्रकाशमय वातावरणात स्वागत केले गेले. या सोहळ्यात हजारो नाशिककर सहभागी झाले होते. दीप प्रज्वलित केल्याने गोदाकाठ देखील उजळून निघाला होता. Sahastra lamp lighting at Godak to welcome the new year

ML/KA/PGB
1 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *