सफाई कामगारांच्‍या विस्‍थापन भत्‍त्‍यामध्‍ये १ जुलै पासून ६ हजार रूपयांची वाढ

 सफाई कामगारांच्‍या विस्‍थापन भत्‍त्‍यामध्‍ये १ जुलै पासून ६ हजार रूपयांची वाढ

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेच्‍या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणा-या विस्‍थापन भत्‍त्‍यामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. ही वाढ १ जुलै पासून लागू होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४ च्‍या मासिक वेतनात जुलै व ऑगस्‍ट या दोन महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे.
सद्यस्थितीत पालिका सेवा सदनिकाधारक सफाई कामगारास विस्‍थापन भत्‍ता १४ हजार रूपये आणि दरमहा घरभाडे भत्‍ता अदा करण्‍यात येतो. या भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार विस्‍थापन भत्‍त्‍यात ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे विस्‍थापन भत्‍ता आता दरमहा २० हजार रूपये करण्यात आला आहे.

ही वाढ १ जुलै पासून लागू होणार आहे. हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रशासकीय तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबरच्‍या मासिक वेतनात जुलै व ऑगस्‍ट महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे .

SW/ML/PGB
30 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *