भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची paytm FIRST GAMES ही जाहिरात बंद करण्याची मागणी

 भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची paytm FIRST GAMES ही जाहिरात बंद करण्याची मागणी

मुंबई दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क ): भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी पेटीएम फर्स्ट गेम’ ही जाहिरात केली.या जाहिराती- मुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जात असून भारतरत्नचा अपमान होत आहे. त्यामुळे ही जाहिरात बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश पवार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात केली.


भारतरत्न ही पदवी सहजासहजी कोणाला देण्यात येत नाही. भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, लोकप्रिय गायिका लता मंगेशकर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, यांच्यासह अनेक मान्यवरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या सोबत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ही भारतरत्न बहाल करण्यात आला आहे .परंतु सचिन तेंडुलकर यांनी पेटीएम फर्स्ट गेम’ ही जाहिरात केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहे .या जाहिरातीमुळे भारतरत्नचा अपमान होत आहे.त्यामुळे आम्ही तेंडुलकर यांना विनंती करतो की, त्यांनी ही जाहिरात तात्काळ बंद करावी, असा सूचना त्यांनी संबंधित जाहिरात निर्मात्याला दयाव्यात.
सचिन तेंडुलकर यांना भारतातील तरुणवर्ग तसेच क्रीडा प्रेमी मोठ्या प्रमाणात मानतात. खरोखरच ते त्याप्रमाणे आहेत. कीडा जगात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे .आम्ही त्यांचा आदर करतो, परंतु पेटीएम फर्स्ट गेम या जाहिरातीमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांनी या संदर्भात ही जाहिरात बंद करावी अशी विनंती नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश पवार यांनी केली आहे.
ही जाहिरात तात्काळ बंद करावी या विनंतीसाठी प्रितेश पवार यांनी आजपासून (सोमवार )आझाद मैदान येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

SW/KA/SL

2 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *