बालभारतीच्या पुस्तकातील सचिन तेंडुलकरांचा पाठ वागळण्याची प्रहार संघटनेची मागणी

 बालभारतीच्या पुस्तकातील सचिन तेंडुलकरांचा पाठ वागळण्याची प्रहार संघटनेची मागणी

मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर हे सातत्याने ऑनलाईन गेमिंग सारख्या जुगाराच्या जाहिराती करतात. त्यांचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन गेमिंग च्या कर्जबाजारीपणामुळे स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या केली आहे. ज्या खेळाडूच्या अंगरक्षकाला या ऑनलाइन गेमिंगच्या जुगारामुळे आत्महत्या करावी लागते त्या क्रिकेटपटूचे पाठ बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनावर किती विपरीत परिणाम करत असतील याचा विचार बालभारती करून अभ्यासक्रमातील इयत्ता चौथीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ वगळण्यात यावा अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बालभारतीच्या इयत्ता ४ थी मध्ये पाठ क्रमांक २० – कोलाज पाठांतर्गत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या बद्दल माहिती असलेला पाठ देण्यात आलेला आहे. या पाठात कोलाज उपक्रमातंर्गत सचिन तेंडूलकर यांचे वर्तनपत्रातील फोटो संकलंन व माहिती संकलंन करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मात्र सचिन तेंडुलकर हे समाजमाध्यमातून ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगार सारख्या जाहिरात मोठ्या प्रमाणात करत आहेत. या परिणामी विद्यार्थ्यांना तेंडुलकर यांच्या बद्दल विचारल्यावर ते क्रिकेट पेक्षा सचिन तेंडुलकर यांच्या ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगार सारख्या जाहिराती बाबत माहिती पटकन सांगतात.

सचिन तेंडूलकर यांच्या क्रिकेटपटू या प्रतिमेपेक्षा ऑनलाईन रमी हि प्रतिमा विद्यार्थी मनावर तयार होत आहे. इयत्ता चौथीतील बालवयातील या विद्यार्थ्यांच्या मनावर जाहिरातीचा परिणाम अधिक खोलवर होतो आहे. ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगार सारख्या समाज विघातक जाहिरातीत श्री सचिन तेंडुलकर आहेत. त्याच्या या जाहिरातीचा बालमनावर होणारा ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगार प्रकार थांबवण्यासाठी या पाठ्यक्रमातील कोलाज अतंर्गत सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरील पाठ तातडीने वगळून टाकावा.
या पाठाऐवजी कोलाज या पाठांतर्गत संगणक या विषयवर संकलन घटक घेतल्यास विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळेल. हे ज्ञान त्यांना पुढील भविष्य काळासाठी उपयोगी राहील अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष
संतोष राजगुरू यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

SW/ML/SL

21 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *