सचिन तेंडुलकरची लेक करणार समाजकार्यात करिअर

 सचिन तेंडुलकरची लेक करणार समाजकार्यात करिअर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अप्रतिम सौंदर्य आणि ट्रेंडींग फॅशन सेन्स यामुळे सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमीच चर्चेत असते. सारा मॉडेलिंग किंवा अभिनय क्षेत्रात करिअर करणार का? अशा चर्चाही सुरु असतात. मात्र आता साराने ग्लॅमरस दुनिये ऐवजी सामाजिक कार्यात करिअर करायचे निश्चित केलं आहे. सारा समाजकार्य हाती घेणार असल्याचं सचिनने स्पष्ट केले आहे. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून देशभर विविध उपक्रम हाती घेतले जातात. हे कार्याला आता साराचाही हातभार लागणार आहे.
सचिनने साराबाबत सांगितले की, ” मला ही गोष्ट सांगताना अत्यानंद होत आहे की, सारा आता सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची संचालिका म्हणून काम करणार आहे. साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. साराने क्रीडा, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून भारताला सक्षम बनवण्याच्या या प्रवासाला सुरुवात केली आहे. ही गोष्ट जागतिक शिक्षण कसे पूर्ण होऊ शकते याची आठवण करून देणारे आहे.”

आपण समाजकार्य करायला हवे, समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करायला हवे, असे साराला लहानपणापासून वाटत होते. कारण साराने लहानपणी आपला वाढदिवस हा अनाथ आश्रमात साजरा करावा, असे सांगितले होते. तेव्हापासून तिच्या समाजकार्याला सुरुवात झाली होती. अशी आठवणही सचिनने सांगितली आहे.

SL/ML/SL

4 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *