हि मुंबई वाचविण्याची लढाई आहे, उमेदवारांची नाही – सचिन अहिर

 हि मुंबई वाचविण्याची लढाई आहे, उमेदवारांची नाही – सचिन अहिर

मुंबई, दि. ७ – बंडखोरांना मतदान करणे म्हणजे भाजपाला मतदान करण्यासारखे आहे. ही लढाई उमेदवारांची नसून मुंबईला वाचविण्याची लढाई आहे. असे वक्तव्य शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी भांडुप मध्ये केले. शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षा (शिवशक्ती) च्या प्रभाग क्रमांक ११४ च्या उमेदवार राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी सचिन अहिर भांडुप मध्ये आले होते.

भांडुप पश्चिम येथून शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरद पवार), च्या उमेदवार राजुल पाटील या प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणुक रिंगणात आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर त्यांचा जोर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. राजुल पाटील या सामाजिक कार्यकर्ते म्हणुन गेले अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांच्यासारखे युवा नेतृत्व या प्रभागाला मिळत असल्याने, शिवाय खासदार त्यांच्या पाठिशी असल्याने या प्रभागाचा विकास वेगाने होईल असे वक्तव्य शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी केले. अपक्ष उमेदवार अनिषा माजगांवकर यांचे नाव न घेता ते म्हणाले प्रत्येक पक्षात बंडखोर असतात त्यांना मतदान करणे म्हणजे भाजपाला मतदान करण्यासारखे आहे. ही लढाई उमेदवारांची नसून मुंबईला वाचविण्याची आहे. मतांचे विभाजन करणे हे योग्य होणार नाही. आम्ही विकास करायला आलो आहे आणि विकास करणार. या प्रभागातील प्रत्येक नागरीकांपर्यंत जाणे गरजेचे असून राजुल पाटील ते काम चांगल्या प्रकारे करीत असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *