रशियाचे अत्याधुनिक सुखोई- ५७ विमान युक्रेनकडून उध्वस्त
मॉस्को, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युक्रेनमधील लष्कराने रशियाचे सुखोई- ५७ हे लढाऊ विमान उध्वस्त केले आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या अस्त्राखान शहरातील हवाई तळावर केला. हा तळ युद्धभूमीपासून ६०० किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यावेळी युक्रेनमधील लष्कराने रशियाचे नवीन आणि अत्याधुनिक सुखोई- ५७ हे लढाऊ विमान उध्वस्त केले. युक्रेनच्या लष्कराने केलेला हा हल्ला अतिशय भीषण होता.
युक्रेनच्या हल्ल्यानंतर अस्त्राखान शहरातील हवाई तळावर केवळ अवशेष दिसत आहेत. रशियाकडे सुखोई-५७ ची ३२ विमाने आहेत. शियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी २०२८ पर्यंत सुखोई-५७ ची संख्या ७६ वर नेण्याचा निर्धार केला आहे. सुखाई-५७ हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या विमानाचा वेग ताशी २ हजार १३० किलोमीटर इतका आहे. हे लढाऊ विमान अतिशय शक्तिशाली असल्याने त्याला नाटोकडून हत्यारा असे नाव संबोधले जाते.
SL/ML/SL
11 June 2024