हायवेवरील सुसाट वाहनांवर RTO ची करडी नजर

 हायवेवरील सुसाट वाहनांवर RTO ची करडी नजर

मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्षांच्या स्वागतासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना अनेकांनी प्रवासाचे बेत आखले असतील. मत्रा मजा मस्तीच्या मुडमध्ये वेगावर नियंत्रण न राहिल्याने आपत्कालिन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेच वेगमर्यादेचे उल्लंघन होऊ नये व नवीन वर्ष सुरक्षित जावे म्हणून आरटीओ सज्ज झाले आहे.

 पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Pune Mumbai Express Highway) सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किमी तर अवजड वाहनांना ताशी 80 किमीची मर्यादा दिली आहे. तरीही चालक वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. या वाहनचालकांना चाप बसण्यासाठी आरटीओ (RTO) कडून मोहीम राबविण्यात येत आहे.

 पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी स्पीडगन लावण्यात आल्या आहेत.सर्वाधिक स्पीड असणाऱ्या गाड्यांमध्ये सर्व गाड्या या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांना ऑनलाईन पद्धतीने दंड पाठविण्यात येत आहे. परंतु प्रत्येक गाडीवर आरटीओची करडी नजर असल्याने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताना आता वेगमर्यादा पाळणे अनिवार्य असणार आहे.

SL/KA/SL

28 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *