RRS च्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा निर्णय

अमरावती,दि. १ :सरन्यायाधीश न्या.भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी अमरावती येथे ऑक्टोबर 5, 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी एका पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवई यांचे नाव प्रमुख अतिथी म्हणून छापण्यात आले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
कमलताई गवई यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आपले जीवन आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहिले आहे. ‘आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार. ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही हा आपल्या संस्काराचा भाग आहे,’ असे त्यांनी निक्षून सांगितले.
कमलताई गवई यांनी पत्र जारी करत, ‘माझे वय 84 असल्याने माझी प्रकृती बरी नाही, त्यामुळे मी RSS च्या कार्यक्रमात जाणार नाही,’ अशी माहिती दिली. या कार्यक्रमामुळे आंबेडकरी चळवळीला वाहिलेले आपले जीवन कलंकित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे.
SL/ML/SL1 Oct 2025