गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारसाठी 105 कोटी रु. मंजूर

“गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” या योजनेअंतर्गत 105.41 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि जलसंधारणाला चालना देणे. शेतकऱ्यांना सुपीक गाळयुक्त माती उपलब्ध करून देणे. पाण्याची साठवणूक क्षमता सुधारून दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देणे. ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्ट्य आहेत.
हा निधी आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग,औरंगाबाद यांच्यामार्फत जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांनी निधी संबंधित अशासकीय संस्थांना तातडीने वितरित करावा आणि याबाबत शासनाला अहवाल सादर करावा. गाळ काढलेल्या कामांची तपासणी करून, पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल. मंजूर केलेल्या निधीपेक्षा अधिक रक्कम अदा करता येणार नाही. जर काही कारणाने निधी खर्च न झाल्यास, तो अन्य कामांसाठी वापरता येणार नाही.
निधी परत शासनाकडे जमा करणे बंधनकारक असेल. संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या कार्यपद्धती आणि सुचनांचे काटेकोर पालन केले असल्याची खातरजमा करावी. जलसंधारण योजनेतर्गत केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाची तपासणी व देयकांची पडताळणी करणे आवश्यक आहे.