आर आर आबांनी माझा केसाने गळाच कापला होता

 आर आर आबांनी माझा केसाने गळाच कापला होता

सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज तासगावात रोहित पाटलांवर हल्लाबोल करीत आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता असा आरोप केला. सांगली जिल्ह्यातील तासगावात माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते बोलत होते. तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघाची वाईट अवस्था आहे. इथल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सूतगिरणी बंद आहे. बाजार समितीची चौकशी सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. मतदारसंघात एकही संस्था उभी नाही.

या ठिकाणी केवळ भाषणं करून लोकांचं पोट भरणार नाही. तर नेतृत्वात धमक असावी लागते, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटलांवर केला. शिवाय सिंचन घोटाळ्याच्या तथाकथित प्रकरणात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला. त्यांनीच माझी ‘ओपन इंक्वायरी’ सुरू करण्याचा फाईलवर सही केली, असाही घणाघाती आरोप पवार यांनी यावेळी केला.

तासगाव – कवठेमहांकाळचे महायुतीचे उमेदवार, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर तासगाव शहरातून पदयात्रा आणि जाहीर सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

ML/ ML/ SL

29 October 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *