रिपब्लिकन पक्ष आता सिक्कीम राज्यात

मुंबई, दि.4
रिपब्लिकन पक्षाची आज सिक्कीम राज्यात स्थापना करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली. सिक्कीम मधील रँग्पो शहरात आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी ची अधिकृत निवड ना.रामदास आठवले यांनी जाहीर केली.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी च्या अध्यक्षपदी नामग्याल भोतिया यांची आणि राज्य सरचिटणीस पदी हरिप्रसाद बुरुम यांची निवड ना.रामदास आठवले यांनी जाहीर केली.यावेळी विचारमंचावर रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे ; राष्ट्रीय सचिव महेश्वर थानांजॉम ; विजय बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठान लाभलेला रिपब्लिकन पक्ष सिक्कीम च्या गावागावात आणि घराघरात पोहोचवा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सिक्कीम मधील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. सिक्कीम राज्यात विधानसभेच्या 32 जागा आहेत.1 राज्यसभा आणि 1 लोकसभेची जागा आहे. सिक्कीम राज्य हे दुर्गम डोंगराळ भागाचे राज्य आहे.सिक्कीम राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण भारत सरकार तर्फे विशेष लक्ष देऊ.येथील जनतेला न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष काम करेल. सिक्कीम राज्याच्या विकासासाठी आपण काम करीत राहू असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य अध्यक्ष पदी निवड झालेले नामग्याल भोतिया हे येथील प्रसिद्ध समाजसेवक आहेत.त्यांनी बुद्धिस्ट फिलॉसॉफीवर पी एच डी केलेली आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून ही ते प्रसिद्ध आहेत.त्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य अध्यक्षपदाची धुरा सोपवली असून ते त्यात यशस्वी होतील असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.