महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईतील मोर्चात बौध्दांनी ताकद दाखवावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि ६- बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक सर्वोच्च श्रध्दास्थान आहे.महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चात सर्व गटतट विसरुन सर्व आंबेडकरी बौध्द जनतेने लाखोंच्या संख्येने सामील व्हावे. बौध्दांनी या शांततापूर्ण विराट मोर्चात आपली ताकद दाखवावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.बांद्रा येथे महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चाच्या प्रसारासाठी साकार करण्यात आलेल्या धम्मरथाचे उद्घाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते बांद्रा येथे आज झाले. त्यावेळी ना .आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; धम्म रथाचे संयोजक उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड,भदंन्त शांतीरत्न थेरो युवक आघाडी मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात आलेच पाहिजे अशी देशभरातील बौध्द जनतेची मागणी आहे.महाबोधी महाविहाराच्या ट्रस्ट बाबत बिहार विधानसभेत 1949 मध्ये बी टी ऍक्ट मंजुर करण्यात आलेला आहे.त्या कायद्यानुसार महाबोधी महाविहाराच्या ट्रस्ट मध्ये 4 हिंदु ,4 बौध्द आणि 1 जिल्हाधिकारी चेअरमन असे 9 सदस्य असतात.त्या बी.डी, ऍक्ट मध्ये सुधारणा करुन सर्व 9 सदस्य हे बौध्द असावेत.महाबोधी महाविहारा ट्रस्ट चा चेअरमन सुध्दा बौध्द असावा.महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात आले पाहिजे.ही देशभरातील बौध्दांची मागणी आहे.या मागणीसाठी येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदानात दुपारी 12 वाजता सर्व बौध्द जनतेच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.या मोर्चात सर्व रिपब्लिकन गट,सर्व बौद्ध संघटना,सर्व पक्षातील बौध्द नेते संपूर्ण बौध्द जनतेच्या वतीने हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात राज्यातील सर्व बौध्दांनी सर्व गट-तट विसरुन या मोर्चात सामील झाले पाहिजे असे आवाहान ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात येण्यासाठी आझाद मैदानात येत्या 14 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या शांततापूर्ण मोर्चात बौध्दजनतेने एकजुटीने लाखोंच्या संख्येने सामील झाले पाहिजे. या मोर्चात बौध्दांनी आपली ताकद दाखवली तर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येण्याचा प्रश्न सुटण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित केलेला मोर्चा बौध्द जनतेने यशस्वी करावा असे आवाहान ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर मुक्कामी बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दिक्षा दिली.धम्मचक्र प्रवर्तन घडविले.
14 ऑक्टोबर ही धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तारीख आहे. त्यामुळेच 14 ऑक्टोबर या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आझाद मैदानात मुंबईत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी प्रचंड विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिच्या वतीने सर्व रिपब्लिकन गट,सर्व पक्षीय बौध्द नेते, बौद्ध संघटनाच्या वतीने हा मोर्चा आयेजित केलेला आहे.या मोर्चात राज्यातील सर्व बौध्दांनी,आंबेडकरी जनतेने एकजुटीने आपली ताकद दाखवावी असे आवाहान ना.रामदास आठवले यांनी केले आहे.KK/ML/MS