रिपब्लिकन पक्षाचे साहित्यिकांशी विचारमंथन ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि २६~ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित व्यापक रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी तसेच बदलत्या काळात रिपब्लिकन पक्षाची वाटचाल मजबूत करण्यासाठी साहित्यिक आणि विचारवंतांशी विचार मंथन करून पुढील वाटचालीचे दिशादर्शन करण्यासाठी येत्या दिनांक 27 आणि 28 ऑगस्ट रोजी महाबळेश्वर मध्ये रिपब्लिकन पक्षाचे विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज दिली.
येत्या बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता महाबळेश्वर येथील ऐश्वर्या इन हॉटेल च्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दोन दिवसीय विचारमंथन शिबिराला सुरूवात होणार आहे.दिनांक 27 आणि 28 ऑगस्ट रोजी महाबळेश्वर च्या थंड हवेत रिपब्लिकन पक्षाचे निवडक कार्यकर्ते आणि राज्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत यांचे सामाजिक; राजकीय; शैक्षणिक आणि आर्थिक विषयावर विचारमंथन होणार आहे. या विचारमंथन शिबिरात ज्येष्ठ साहित्यिक डॉ शरण कुमार लिंबाळे;डॉ अच्युत माने,; डॉ ऋषिकेश कांबळे; ॲड.दिलीप काकडे ; डॉ प्रा विजय काळेबाग; प्रा अमर कांबळे; प्रा विजय खरे;प्रा कुमार अनिल ; के वी सरवदे;योगीराज वाघमारे;डॉ संजीवकुमार सोनवणे; रमेश जाधव ; विठ्ठल शिंदे; प्रा प्रशांत मोरे विजय साबळे;,विजय मोरे ; आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बदलत्या राजकीय सामाजिक समीकरणे आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाची भूमिका; विविध समाज घटकांचा आरक्षणाचा प्रश्न ; खाजगीकरण आणि खाजगी क्षेत्रातील आरक्षण ; दलित बहुजनांचे शैक्षणिक प्रश्न ; दलितांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार चळवळीत सहभाग या सह रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी विविध दलित आदिवासी बहुजन जाती समूहांसोबत अन्य सवर्ण आणि अल्पसंख्यांक जात समूहांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा जनाधार वाढविणे तसेच आगामी काळात दलित पँथर सारख्या लढाऊ संघटनेची स्थापना करावी का आदी अनेक विषयांवर या विचार मंथन शिबिरात मंथन होणार असून कार्यकर्त्यांना साहित्यिक विचारवंतांचे बौद्धिक मिळणार आहे.या दोन दिवसांच्या विचार मंथन शिबिरात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रा.शहाजी कांबळे आणि संयोजक रिपाइं चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली आहे.KK/ML/MS