रिपब्लिकन पक्षाला झेड पी मध्ये 5 जागा आणि मुंबई महानगर पालिकेत 20 जागा मिळाव्यात ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि ३~ युती सोबत रिपब्लिकन पक्ष सन 2012 साली आल्यामुळे युती ची महायुती झाली आहे.आगामी मुंबई महानगर पालिकेत रिपब्लिकन पक्षाला किमान 20 ते 25 जागा सोडल्या पाहिजेत.जिल्हा परिषद मध्ये किमान 5 आणि पंचायत समिती मध्ये 1 जागा सोडल्या पाहिजेत.महायुती मध्ये अनेक पक्ष आले असले तरी प्रमुख पक्ष म्हणून भाजपने महायुती चा घटका पक्ष रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तसेच रिपब्लिकन पक्षाला राज्य सरकार मध्ये सत्तेत वाटा म्हणून एक राज्यात मंत्रिपद एक एम एल सी कार्यकर्त्यांना महामंडळ सदस्य ; जिल्हा नियोजन समिती आणि एसइओ पदे दिली पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती ची संयुक्त बैठक घेऊन रिपब्लिकन पक्षाकडे ध्यान देऊन महायुती चे जागावाटप निश्चित केले पाहिजे असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटी ची बैठक झाली त्यात ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी बिनविरोध नुकतीच पुन्हा निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद ; पंचायत समिती आणि मुंबई महानगर पालिका या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असा ठराव करण्यात आला.भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना रिपब्लिकन पक्षासह सर्व घटकपक्षांनी महायुती म्हणून एकजुटीने स्थानिक स्वराज्य.संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट होईल .मराठी मते आमच्या सोबत ही आहेत.त्यामुळे मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
अमेरिकेने भारताची अर्थव्यवस्थेला म्हटले जरी डेड..
तरी भारताच्या अर्थव्यवस्थेचे नरेंद्र मोदी आहेत हेड…

बाबतची अर्थव्यवस्था जगात 4 था क्रमांक आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला डेड म्हणणाऱ्या अमेरिकेला समर्थन देऊन राहुल गांधी आपल्या देशाचा अपमान करीत आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी राजकारण करावे मात्र देशाच्या अर्थव्यवस्थे विरुद्ध परदेशातील नेता बोलत असताना त्यांना समर्थन देणे हा आपल्या देशाचा अवमान करणे आहे.राहुल गांधींनी अमेरिकेचे समर्थन करून भारताचा अवमान केला आहे त्यांचा आम्ही रिपब्लिकन पक्षा तर्फे निषेध करतो असे रिपाइं च्या बैठकीत ना. रामदास आठवले म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबत रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच भाजप चे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेईल असे ना. रामदास आठवले म्हणाले.रिपाइं च्या महाराष्ट्र राज्य कमिटी च्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे; कार्याध्यक्ष बाबुराव कदम; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; पप्पू कागदे प्रकाश लोंढे; रमेश मकासारे; चंद्रकांत सोनकांबळे; सौ शिलाताई गांगुर्डे; ॲड.आशाताई लांडगे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. KK/ML/MS