रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक संपन्न

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक संपन्न

पुणे, दि २४: नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका निशा मानवतकर, माजी नगरसेवक, संतोष आरडे, सुधीर वाघमोडे, रेणुका चलवादी, जयदेव रंधवे, हुलगेश चलवादी,  महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, टी. आर. तांबोळी, राजेंद्र चुव्हाण, नीलेश रोकडे, सुधीर जगताप, अॅड. भाऊसाहेब गोफणे, लिंबा कावरे, मनीषा मोहिते, कुणाल चावरे, विक्रांत कानडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. पक्षाचे तीन उमेदवार निवडणूकीत यश संपादन करू शकले नाहीत त्यातील दोन उमेदवारांच तर अवघ्या दोनशे पेक्षा कमी मतांनी पराभव झाला, या पराभवाची कारण मीमांसा यावेळी करण्यात आली.  तसेच या बैठकीत शहरातील संघटनात्मक बळकटीकरण, आगामी निवडणुकांची तयारी तसेच समाजसेवेशी संबंधित विविध प्रकल्पांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिक विकासासाठी नव्या विकासात्मक योजनांची आखणी, शहरात  पक्षाची असलेली भक्कम ताकद लक्षात घेऊन विकासकामांचा आराखडा तयार करणे, तसेच पंचवार्षिक कार्यक्रम निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आणि  एसआरए चे प्रश्न  प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा  निर्धार व्यक्त करण्यात आला. 

सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र आणत सामाजिक ऐक्य वाढवणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच निवडणूकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *