रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळेच मुंबईत महायुतीचा महाविजय
मुंबई, दि १९- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपांइं महायुतीचा महाविजय झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे नेतृत्व राजकीय करिष्मा करणारे नेतृत्व आहे. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांनाच सत्ता मिळते. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळेच मुंबईत महायुतीचा महाविजय झाला आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासह राज्यातील एकुण 29 महापालिकांमध्ये महायुतीचे अनेक नगरसेवक निवडुन आले. 29 पैकी 25 महापालिकांमध्ये महायुतीचा विजय झालेला आहे. रिपब्लिकन पक्ष हा भाजप आणि महायुतीचा घटक पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला, पुणे, पिंपरी चिंचवड मुंबईत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी अनेक सभांना संबोधित केले. मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि पुणे या भागात महायुतीचा महाविजय झाला आहे. या महाविजयात रिपब्लिकन पक्षाचाही वाटा आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्चातील रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिल्यानेच मुंबई आणि अन्य महापालिकांमध्ये महायुतीचा महाविजय झालेला आहे असा दावा आज रिपब्लिकन पक्षाने केला.
रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांचाच निवडणुकीत विजय होत असतो असे अनेक निवडणुकांमध्ये सिध्द झालेले आहे. रामदास आठवले यांनी पाठिंबा दिलेले पक्ष सत्तेत येतात म्हणुनच सत्तेचा वाटा रिपब्लिकन पक्षाला मिळतो. याची प्रचिती मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा आली. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिल्यामुळेच महायुतीचा मुंबईत महाविजय झालेला आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस गौतम सोनवणे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी आज प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला.
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला एक ही जागा महायुती ने सोडली नाही तरीही मोठ्या मनाने केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने महायुतीचा प्रचार केला.मुंबईत केवळ 11 जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढला.त्या जागांवर महायुती चे उमेदवार ही लढत असल्याने महायुती चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांबाबत मैत्रीपूर्ण लढत झाली.त्यात . महायुती च्या उमेदवारांचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे महायुती च्या संयुक्त सभांतून प्रचार करीत होते.तसेच महायुतीचे उमेदवार ना. रामदास आठवले यांचा फोटो लावून निळा झेंडा घेऊन प्रचार करीत होते. त्यामुळे साबळवर लढणाऱ्या रिपब्लिकन उमेदवारांबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाल्याने स्वबळावर लढणाऱ्या रिपब्लिकन उमेदवारांना मतदान कमी झाले.रिपब्लिकन पक्षाचा महायुती ला जाहीर पाठिंबा असल्याने रिपब्लिकन उमेदवारांना मिळणारे रिपब्लिकन पक्षाचे; आंबेडकरी जनतेचे मतदान महायुती च्या उमेदवारांना वर्ग झाले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या स्वबळावर लढणाऱ्या उमेदवारांना कमी मतदान झाल्याचा खुलासा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे आणि मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केला आहे. KK/ML/MS