रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई प्रदेशच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांच्या हस्ते सौ.प्रितमाला साळवी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव ;महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा खान आदि मान्यवर उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी मंत्री दिवंगत प्रितमकुमार शेगावकर यांच्या त्या सुकन्या आहेत.रिपब्लिकन चळवळीचे बाळकडु त्यांना लहान पणापासुन लाभले आहे.रिपब्लिकन चळवळीचा वारसा त्यांना घरातुनच लाभला आहे.त्यामुळे प्रितमाला पुलकेशी साळवी या रिपब्लिकन महिला आघाडीचे चांगले काम करतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांनी व्यक्त केला.
सौ.प्रितमाला पुलकेशी साळवी यांची रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मुंबईतील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर आमचा अतूट विश्वास आहे. प्रतिमकुमार शेगावकर यांच्या कडुनच रिपब्लिकन पक्षाचा आम्हाला वारसा लाभला आहे.ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाशी आमचा पूर्ण परिवार एकनिष्ठ राहिला आहे.प्रितमकुमार शेगावकर यांनी आयुष्यभर ना.रामदास आठवले यांना साथ दिली आहे.मुलगी म्हणुन शेगावकर यांचा वारसा रिपब्लिकन पक्षात आपण चालविनार आहोत. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहुन आपण महिला आघाडीच्या माध्यमातुन आपण काम करित राहु असा विश्वास सौ.प्रितमाला पुलकेशी साळवी यांनी व्यक्त केला. KK/ML/MS