सर्वात मोठ्या “रॉयल रोडिओ” या स्पर्धेस प्रारंभ
कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्या वतीनं भारतातील सर्वात मोठ्या “रॉयल रोडिओ” या स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एमटीबी सायकल सुपर क्रॉस स्पर्धा पार पडल्या.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये काल (१६ डिसेंबर रोजी) ऑटो क्रॉस स्पर्धा झाल्या.
या सर्व स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी सांगवडे रोडजवळील मोहितेज रेसिंग अकॅडेमी यांच्या ट्रॅक वर होत आहेत. एम. टी. बी सुपर क्रॉस ही स्पर्धा भारतात केवळ कोल्हापूरमध्ये सुपर क्रॉस ट्रॅकवर झाली.
देशभरातून ५०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. एकूण ९०० मीटर अंतराच्या ऑफ रोड ट्रॅकवर ही स्पर्धा झाली.फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेनं या स्पर्धा घेण्यात येत आहेत.यावेळी बी.पी.सी.एल कंपनीचे मनोजकुमार सेन, रि. लेफ्टनंट कर्नल सोहम रॉय, रेसिंग चॅम्पियन ध्रुव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील ,१७ वर्षाच्या आतील,१८ ते ३० वयोगट,३१ ते ४५ वयोगट आणि ४५ च्या वरील वयोगट सहभागी झाले होते.८०० मीटरच्या ट्रॅक वर होणाऱ्या या स्पर्धा असून मोटर सायकल, बाईक, स्कुटर(मोपेड) आणि प्रथमच ई व्हेईकल इलेक्ट्रॉनिक स्कूटर अशा गटामध्ये होत आहेत.
बाईकच्या सीसी गटामध्ये ही स्पर्धा टाइमट्रायलवर पद्धतीनं होत आहेत. एकूण ९०० मीटर अंतराच्या ऑफ रोड ट्रॅकवर ही स्पर्धा होत आहे. वेगवेगळ्या २२ प्रकारच्या गटात ही स्पर्धा होत असून बाईक मधील सर्व प्रकार यात आहेत. या स्पर्धा साहस क्रीडा शौकिनांसाठी मोफत आहेत.
रविवारी १८ डिसेंबर रोजी मोटरसायकल सुपर क्रॉस रेसिंगची स्पर्धा होणार आहे.वेगवेगळ्या २२ प्रकारच्या गटात ही स्पर्धा होत असून बाईक मधील सर्व प्रकार यात असतील. या ठिकाणी वेगवेगळ्या मोटर बाईकचे एक्सपो प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे.
ML/KA/SL
18 Dec. 2022