Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच

मिलान, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील बाईकप्रेमींमध्ये सध्या इलेक्ट्रिक बाईक घेण्याची क्रेझ वाढली आहे. हे लक्षात घेऊन विविध नामवंत कंपन्या आपापल्या लोकप्रिय बाईक मॉडेल्सची इ-बाईक व्हर्जन्स बाजारात आणत आहे. इंधनाची होणारी बचत, पर्यावरणस्नेही गुणधर्म अशा कैक गोष्टींमुळे इलेक्ट्रीक वाहनांना अनेक वाहनप्रेमी पसंती देतात. याच यादीत आला अनेकांच्याच पसंतीच्या रॉयल एनफिल्डचीही एन्ट्री झाली आहे, कारण Electric Vehicle च्या क्षेत्रात एनफिल्डनंही ग्रँड एन्ट्री घेतली आहे.
इटलीतील मिलान इथं आयोजित करण्यात आलेल्या EICMA मोटर शो सुरू होण्यापूर्वी एनफिल्डनं पहिल्या इलेक्ट्रीक बाईकच्या रेंजवरून पडदा उचलला आहे. Flying Flea असं ना या बाईकच्या सब्सिडियरीला देण्यात आलं असून, सर्वप्रथम C6 हे मॉडेल लाँच करण्यात आलं आहे. एनफिल्डच्या या इलेक्ट्रीक व्हीकलच्या सब्सिडियरीच्या नावाची प्रेरणा 40 च्या दशकात सादर करण्यात आलेल्या फ्लाईंग फ्ली या जुन्या मॉडेलपासून घेम्यात आली आहे. एनफिल्डच्या इतर बाईकपेक्षा या इलेक्ट्रीक बाईकला पूर्ण नवा लूक देण्यात आला आहे. स्टायलिंगमध्ये ही बाईक रेट्रो दिसत असली तरीही कंपनीनं तिला अतिशय आधुनिक रुपात सादर केलं आहे. या बाईकचा लूक लो स्लंग बॉबर मोटरसायकलसारखा असून, त्यामध्ये रेक आऊट फ्रंट , सोलो सॅडल देण्यात आला आहे.
C6 ची फ्रेम फोर्ज्ड अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आली आहे. बाईकमध्ये नवा स्वीचगियर, ऑल एलईडी लायटिंग आणि हटके हेडलाईट देण्यात आली आहे. मागे आणि पुढे डिस्क ब्रेक असणारी ही बाईक शहरी वापरासाठी उत्तम पर्याय असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. सध्या कंपनीनं सोलो सीटर म्हणजेच एका व्यक्तीची आसनव्यवस्था असणारी बाईक लाँच केली आहे. मात्र पिलियन रायडर सीटचाही पर्याय दिला जात आहे. या बाईकची किंमत अद्याप समोर आलेली नाही.
SL/ML/SL
11 Nov. 2024