रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि १७
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नुकतेच दादर येथील
टिळकभवन येथे
भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात आमदार भाई जगताप यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी,करीअर मार्गदर्शनही केले. महत्वाचे म्हणजे येणारे विद्यार्थी, रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना अनेक पर्याय उपलब्ध होतेच पण त्यांच्या समस्या, व्यथा शांतपणे ऐकून त्यांना मार्गदर्शन केले जात होते.तसेच ज्यांना रोजगार मिळाला त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहुन मन प्रसन्न झाले. काँग्रेस पक्षाचे नाव तळागाळातील लोकांच्या मला मला जोडलेली आहे. काँग्रेस पक्ष कधीही जातीपातीचा राजकारण करत नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन चालले हे काँग्रेसचं प्रेमाचा आपुलकीचा धोरण आहे. यापुढे देखील काँग्रेस पक्ष मजबुतीने एकजुटीने लडेल आणि जिंकणार असल्याचे भावना आमदार भाई जगताप यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी, स्मिता चौधरी, गोरख कांगणे, संदेश कोंडविलकर यांनी विशेष मेहनत घेतली.KK/ML/MS