आमदार रोहित पवार यांनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट

मुंबई, दि २८
आमदार रोहित पवार तसेच मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांची बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्य कार्यालय, सीएसटी येथे भेट घेतली. या भेटी मध्ये त्यांनी मुंबईतील विविध विभागातील सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पावसाळ्यात मुंबई निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल देखील त्यांनी आयुक्तांना विविध सूचना केल्या या सूचनांचा योग्य ती कार्यवाही करून या समस्या सोडवण्यासाठी आश्वा आयुक्त गगराणी यांनी यावेळी या सर्व शिष्टमंडळाला दिले. आम्ही आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्या तसेच अनेक सूचना केल्या त्या सर्व सूचनावर त्यांनी योग्य ते प्रकारे कारवाई करून आपणास अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती दक्षिण मुंबई महिला जिल्हाध्यक्ष वनिता तोंडवळकर यांनी दिली. यावेळी बेसिक सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तसेच महिला तालुका अध्यक्ष भारतीताई पाटील,मुंबई महिला सचिव जयश्रीताई जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. KK/ML/MS