रोहित शर्मा ठरला ICC च्या सर्व स्पर्धांच्या अंतिम सामन्यात खेळणारा जगातील पहिलाच कर्णधार

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने पराभूत केले. यामुळे भारताने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली, पण यासोबतच कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर एक विश्वविक्रम झाला आहे. रोहित शर्मा ICC च्या सर्व स्पर्धांच्या अंतिम सामन्यात खेळणारा जगातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. त्याने कर्णधार म्हणून कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023, वनडे वर्ल्ड कप 2023, टी20 वर्ल्ड कप 2024 या ICC स्पर्धेत कर्णधार म्हणून अंतिम सामने खेळले आहेत. यापूर्वी 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम सामना खेळला होता.