रोहित पवार गुन्हेगाराला पाठीशी घालतात, विधानसभेत झाले आरोप
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकण्याची भाषा करणारा योगेश सावंत हा आ. रोहित पवार यांचा कार्यकर्ता आहे, सावंत याला अटक करू नये यासाठी आ. पवार यांनी पोलिसांना फोन केला होता त्यामुळे आ .रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या राम पवार यांनी सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली . यावर गदारोळ झाला, दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये यावेळी विधानसभेत शाब्दिक चकमक झाली.
योगेश सावंत बारामती येथील आहेत , मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे असं आशिष शेलार म्हणाले. यामुळे रोहित पवार यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी कदम आणि शेलार यांनी सभागृहात केली.
कुठल्याही नेते, समाजा विरोधात असं विधान करणे कुणीही मान्य करणार नाही. मात्र सभागृहात शरद पवारांचे नाव घेतलं गेले, कुणाचेही नाव घेण्याआधी नोटीस द्यावी लागते. पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कुणाचेही नाव घेण्याचा अधिकार नाही. जर नाव घेतले असले तर कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
एक समाज ३ मिनिटांत आम्ही संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू असं व्हिडिओत आहे. युवासेनेच्या यावर पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. त्याने तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहे असं मान्य केले. रोहित पवार यांनी स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचा संबंध काय? मराठा समाज शांततेत आंदोलन करतो. जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या बाजूने भूमिका घेतली. परंतु जेव्हा त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास यायला लागला तेव्हा आता सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या. योगेश सावंतचा पत्ताही बारामतीतला आहे. रोहित पवार यांचा योगेश सावंतशी संबंध काय ? योगेश सावंत याच्यामागे कण आहे याची चौकशी झाली पाहिजे असं आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. अखेर यावर सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी सूचना पिठासीन अधिकारी दीपक चव्हाण यांनी शासनाला केली.
ML/KA/SL
29 Feb. 2024