पुण्यातील रोहिडेश्वर किल्ल्याला मिळाला संरक्षित स्मारकाचा दर्जा, होणार जतन

भोर तालुक्यातील रोहिडेश्वर किल्ल्याला राज्य सरकारने मंगळवारी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पुण्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहास यादव काळापासून सुरू होतो. 1666 मधील पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. मात्र, 24 जून 1670 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. या घोषणेमुळे किल्ल्याच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे.शिवाय किल्ल्याचे जतनही उत्तम प्रकारे होणार आहे.