Australian open मध्ये विजेतेपद मिळवत, रोहन बोपण्णाने केला विश्वविक्रम
मेलबर्न, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकले आहे.४३ वर्षांच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीचे विजेतेपद जिंकले. इंडो-ऑस्ट्रेलियन एक्स्प्रेसने फायनलमध्ये इटालियन जोडी बोलेली आणि वाव्हासर यांचा ७-६ (०), ७-५ असा पराभव केला. या जेतेपदासह त्याने आता एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.बोपण्णा ४३ वर्षांचा आहे. एवढ्या वयात ऑस्ट्रेलियाच्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी जगातील कोणत्याही खेळाडूला ४३ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले नव्हते.
बोपण्णा यावेळी भन्नाट फॉर्मात होता. कारण यावर्षी त्याचा खेळ चांगलाच बहरल्याचे पाहायला मिळत होते. यावर्षी त्याला साथ लाभली ती एडबेनची. बोपण्णा आणि एडबन यांनी या स्पर्धेत आतापर्यंत आपले वर्चस्व राखले होते. या दोघांनी कधी प्रतिस्पर्धी खेळाडूला वरचढ होण्याची संधी दिली नाही. या स्पर्धेच्या फायानलमध्येही हीच गोष्ट झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या बोपण्णा आणि एडबेन या जोडीने पहिला सेट चांगलाच गाजवला. या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली खरी. पण त्यानंतर या दोघांनी शिताफीने खेळ करत हा सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही त्यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. दुसरा सेट यावेळी त्यांनी ७-५ असा जिंकला आणि त्यांनी जेतेपद पटकावले.
टेनिस जगतातील एक प्रमुख ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी जबरदस्त स्टॅमिना आणि चपळाई आवश्यक असते. बोपण्णाचे वय पाहता तो यावर्षी कामगिरी करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या वयात कोणत्याही खेळाडूला या स्पर्धेत यश मिळवता आले नव्हते. पण बोपण्याने यावेळी आपल्या टीकाकारांनी चोख उत्तर देत विजेतेपदासह एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
SL/KA/SL
27 Jan. 2024