चक्क रोबाटने केली आत्महत्या, कामाच्या ताणाला कंटाळला

 चक्क रोबाटने केली आत्महत्या, कामाच्या ताणाला कंटाळला

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोरियामध्ये एका रोबोटने आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले आहे. उत्तर कोरियातील गुमीमध्ये कामाचा ताण आल्याने रोबोटने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. हा रोबोट प्रशासकीय अधिकारी होता. हा रोबो पायऱ्यांवरून घसरून निष्क्रिय अवस्थेत सापडला. रोबोट प्रशासकीय कामे करणारा एकमेव होता. गेल्या १० महिन्यांमध्ये त्याने प्रचंड मेहनतीने कामे केली होती. याबाबात सध्या चौकशी सुरू आहे.
कॅलिफोर्नियातल्या ‘बेअर रोबोटिक्स’ या फर्मने रोबो तयार केला होता. ऑगस्ट २०२३ पासून तो प्रशासकीय कामे हाताळणे, इमारतीमध्ये स्वतंत्रपणे फिरणे यांसारखी कामे करायचा. त्याला एम्प्लॉयी आयडी देण्यात आले होते. ज्या व्यक्तीने त्या रोबोला पायऱ्यांवरून खाली कोसळताना पाहिले, त्याच्या म्हणण्यानुसार, तो रोबो गोंधळल्यासारखा दिसत होता आणि खाली पडण्याआधी एकाच जागी गोल गोल फिरत होता.कोरियातील या घटनेने तंत्रज्ञान विश्व हादरले आहे.

ML/ML/PGB 4 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *