अमेरिकेत PNG ज्वेलर्सवर दरोडा

 अमेरिकेत PNG ज्वेलर्सवर दरोडा

बे एरिया, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील प्रसिद्ध ज्वेलर्स PNG च्या अमेरिकेतील शाखेवर २० दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. 12 जूनला मध्यरात्री दरोडेखोरांनी दुकानात घुसून दागिने लुटले होते. लुटीनंतर दरोडेखोर वेगवेगळ्या कारमधून पसार झाले. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोर पीनएजी ज्वेलर्समध्ये घुसले होते. यादम्यान त्यांनी काचा फोडण्यासाठी हातोडा आणि इतर गोष्टींचा वापर केला. लुटीनंतर दरोडेखोर पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि 5 जणांना अटक केली.

पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत अटक करण्यात आलेल्या पाचही दरोडेखोरांची ओळख पटवली आहे. टोंगा लाटू, तावके एसाफे, ओफा अहोमाना, किलिफी लीएटोआ आणि अफुहिया लावकेयाहो अशी त्यांची नावंही आहेत. या पाचही जणांवर सशस्त्र दरोडा आणि वाहन चोरीसह अनेक गुन्हे दाखल करत जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. याआधी नितीन ज्वेलर्स (4 मे) आणि नेवार्कमधील भिंडी ज्वेलर्स (29 मे) येथेही दरोडा टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे तिन्ही दरोड्यांमधील मोडस ऑपरेंडी सारखीच आहे. दरोडेखोरांनी डिस्प्ले केसेस हातोड्याने तोडण्यापासून ते कारमधून पळण्यापर्यंत सर्व सारखंच आहे. या घटनेनंतर अमेरिकतील भारतीय ज्वेलर्सना टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

“सध्या, आमचे अधिकारी या तिन्ही दरोड्यांचा एकमेकाशी काही संबंध आहे का याची पाहणी करत आहेत,” अशी माहिती सार्वजनिक सुरक्षा विभागाचे सार्वजनिक माहिती अधिकारी कॅप्टन डझान ले यांनी दिली आहे. तसं असल्यास भविष्यात प्रसिद्धीपत्रकाद्वारे ते जाहीर करण्यात येईल असं ते म्हणाले आहेत.

SL/ML/SL

14 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *