चंद्रपुरात पुन्हा पावसाने रस्ते झाले बंद…
चंद्रपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच दिवसांच्या विश्रांती नंतर चंद्रपूर जिल्हाला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे, ओसरलेल्या पुराने पुन्हा धडक दिली त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग बंद करण्यात आले आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग..
- गोंडपिपरी पोंभूर्णा मार्ग बंद वाढोली पुलावरून पाणी
- कुलथा मार्ग बंद
•लाठी अर्वी मार्ग बंद
•लाठी वेजगाव मार्ग बंद
चंद्रपूर-मूल-गड़चिरोली मार्ग बंद, अंधारी नदीला अजयपूर जवळ पूर
गडचांदूर ते चंद्रपूर मार्गावरील भोयेगाव- धानोरा पुलावर पाणी आले असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बामणी-राजुरा मार्गावर वर्धा नदीचे पाणी पुलाला टेकले. तूर्तास मार्ग सुरू पण बंद होण्याची शक्यता आहे.
ML/ML/SL
25 July 2024