जलसमाधी मिळालेला रस्ता पाणी आटल्याने पुन्हा अवतीर्ण

 जलसमाधी मिळालेला रस्ता पाणी आटल्याने पुन्हा अवतीर्ण

कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सभोवताली जंगल आणि धरणाच्या विस्तीर्ण परिसरातून जाणारा, कधी काळी कोल्हापूर वरून कोकणात उतरण्यासाठी असलेला आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील आणि राधानगरी धरणाच्या उभारणीनंतर जलसमाधी मिळालेला रस्ता आता धरणातील पाणी आटल्याने पुन्हा अवतीर्ण झाला आहे. आज जेव्हा धरणतील पाणी कमी झाले तेव्हा तेवढ्याच दिमाखात पुन्हा आपलंअस्तित्व दाखवतो आहे. जांभा आणि काळा दगड वापरून केलेला शंभर वर्षांपूर्वीचा हा रस्ता एरव्ही संपूर्ण वर्षभरात 11 महिने पाण्याखाली असूनसुद्धा आजही सुस्थितीत आहे.आजही या रस्त्यावरून जुने दगडी पूल, मोऱ्या पार करीत आपण राधानगरी मधून दाजीपूर ला पोहचू शकतो. शाहू महाराजांनी बांधलेली ही वाट त्यांचा वारसा सांगणारी आहे.

ML/KA/PGB 6 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *