RMC प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 RMC प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मिरा-भाईंदर दि ९– परिसरातील घोडबंदर गाव येथे सुरू असलेल्या RMC (Ready Mix Concrete) प्लांटमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने तात्काळ कारवाई करून हा प्लांट बंद करण्याची मागणी तेथिल स्थनिक रहिवाश्यांकडून करण्यात आली होती. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तातडीने RMC (Ready Mix Concrete) प्लांट बंद करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात मंत्री सरनाईकांनी सांगितले की, “RMC प्लांटमधून होणारे धूर, धूळकटज आणि आवाज यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. श्वसनासंबंधी आजार, दमा, अॅलर्जी यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला असून शालेय मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक फटका बसत आहे. तसेच या प्लांटमुळे शेतीजमिनीचे नुकसान, भूजल व मातीत प्रदूषण होत असल्याची तक्रार समोर आली आहे.

पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आपली जबाबदारी आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणारे व पर्यावरणास अपायकारक ठरणारे RMC प्लांट्स तात्काळ बंद करण्याची कार्यवाही व्हावी, यासाठी मी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अधिकृत पत्र दिले आहे. नागरिकांच्या जीवनाशी कुठल्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही.”ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *