सावित्री आणि गांधारी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

 सावित्री आणि गांधारी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

महाड, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रात्री पासून तुफान पाऊस पडतोय या पडणाऱ्या पावसाने सावित्री आणि गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीने रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळत आहे.

शहरातील सुकट गल्लीत पाणी शिरले तर दुसरीकडे महाड कडून किल्ले रायगड कडे जाणाऱ्या दस्तुरी नाका या मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील सखल भागात पुराचे पाणी साचायला सुरवात झालीय नगर पालिका प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क रहाण्याचा ईशारा दिला आहे.

ML/ML/SL

25 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *