रितेश-जिनिलियाचा ‘वेड’ उद्या सिनेरसिकाच्या भेटीला

 रितेश-जिनिलियाचा ‘वेड’ उद्या सिनेरसिकाच्या भेटीला

मुंबई, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रितेश आणि जिनिलिया देशमुख या रसिकांच्या लाडक्या मराठी बॉलिवूड जोडीचा मराठी चित्रपट उद्या प्रदर्शित होत. या निमित्ताने रितेश चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तर जिनिलिया प्रथमच मराठी चित्रपटात अभिनय करणार आहे.

रितेश-जिनिलिया जोडीच्या वेड या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिजर आणि ट्रेलर मुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर अजय-अतुल यांचे संगित असलेल्या या चित्रपटातील गाण्यांमुळे रसिकांना खरोखरच वेडं केलं आहे.

वेड या चित्रपटात रितेश-जेनिलियासह विद्याधर पाठारे आणि अशोक सराफ यांच्याबरोबरच विद्याधर जोशी आणि शुभंकर तावडे, बाल कलाकार खुशी हजारे यांच्या भूमिका आहेत.  सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून चित्रपटात एका गाण्यापुरती हजेरी लावणार आहे.

मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे. आता रितेश-जेनिलियाच्या चाहत्यांची उत्सुकता अखेर उद्या पूर्ण होणार आहे.

SL/KA/SL

29 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *