या दिवशी प्रदर्शित होणार रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’

मुंबई, दि. २१ : रितेश देशमुखचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा पहिला लुक समोर आला आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच शेअर करण्यात आलं आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषा आणि त्याचबरोबर जगभरात देखील प्रदर्शित होईल.
अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, देशमुख असे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे यात दिसणार आहेत.