तेलाच्या किमती व बॉण्ड यील्ड मधील वाढीने भारतीय बाजाराला(Stock Market) झटका.
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत
मागील आठवडा बाजारासाठी प्रतिकूल ठरला. सलग चार आठवड्यांच्या वाढीचा विक्रम बाजाराने मोडून खालच्या स्तरावर बंद झाला. जागतिक बाजारातील कमजोरी, अमेरिकन बॉण्ड यील्ड मध्ये होत असलेली वाढ,संभाव्य व्याजदर वाढीची भीती ,संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मध्ये झालेला ड्रोन हल्ला व त्यामुळे तेल्याच्या किमतीत झालेली वाढ,विदेशी गुंतवणूकदारानी(FII) केलेली विक्री तसेच भारतीय कंपन्यांच्या तिमाही निकालातील ऑपरेटिंग मार्जिन वरील दबाव. (Hindustan Unilever या कंपनीने दिलेल्या निवेदनात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर ताण असल्याचे जाहीर केले) या प्रमुख कारणांमुळे संपूर्ण आठवडा बाजार दबावाखाली होता. या आठवड्यात सेन्सेक्समध्ये २,१८५ अंक (३. ५७%) व निफ्टीत ६३८.५५ अंक (३.४९%) इतकी घसरण झाली.विदेशी गुंतवणूकदारांनी १२,६४३.६१ करोडची विक्री केली त्याबरोबर देशी गुंतवणूकदारांनी ५०८.०४ करोडची खरेदी केली.(Foreign institutional investors sold equities worth of Rs 12,643.61 crore, and domestic institutional investors bought shares worth of Rs 508.04 crore)
येणारा आठवडा हा अर्थसंकल्पाच्या अगोदरचा आठवडा असल्याने महत्वाचा आहे.गुंतवणूकदारांचे लक्ष खास करून निफ्टीतील महत्वाच्या कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल,US fed चा व्याजदरासंबंधातील निर्णय यावर असेल. २६ जानेवारी रोजी बाजार प्रजासत्ताक दिनानिमित्त बंद राहतील.
जागतिक बाजारातील घडामोडींमुळे बाजाराचे सेंटीमेंट खराब झाले आहे तसेच केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजार खालच्या स्तरावर बंद झाले आहेत. डाऊ जोन्स(dow jones) ४५० अंकांनी कोसळून बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात चढउताराचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारानी अत्यंत सावध पवित्र घ्यावा व दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागांची खरेदी करावी
निफ्टीचा 18,300 च्या वर बंद. Nifty ends above 18,300
आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत होता. ऑटो,पॉवर,रिअल इस्टेट( auto, power, realty ) कंपनांच्या समभागात मात्र खरेदीचा जोर होता. बँकिंग आणि फार्मा(banking and pharma) क्षेत्रातील नरमीमुळे बाजारावर दबाव होता. तरीही निफ्टीने १८,३०० च्या वर जाण्यात यश मिळवले.डॉलरच्या तुलनेत रुपया ९ पैशानी कमजोर झाला.बाजार बंद होताना सेन्सेक्स ८५ अंकांनी वधारून ६१,३०८ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने ५२ अंकांची वाढ घेउन १८,३०८ चा बंददिला. Markets end with marginal gain in the choppy session supported by the auto, realty, and power names.
सेन्सेक्स ५५४ अंकांनी घसरला. Sensex plunges 554 pts
मंगळवारच्या सत्रात शेवटच्या तासात झालेल्या प्रचंड नफावसुलीमुळे बाजार १%ने घसरला. निफ्टी १८,२००च्या खाली घसरला.सगळ्या क्षेत्रातील विक्रीमुळे सेन्सेक्स ५००अंकांनी पडला. जागतिक बाजारातील कमजोरी, अमेरिकन बॉण्ड यील्ड मध्ये होत असलेली वाढ,संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मध्ये झालेला ड्रोन हल्ला व त्यामुळे तेल्याच्या किमतीत झालेली वाढ या सर्व बाबींमुळे बाजारावर दबाव वाढला व दुपारच्या सत्रात बाजार कोसळला व सकाळच्या तेजीचे रूपांतर मंदीत झाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५५४ अंकांनी घसरून ६०,७५४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १९५ अंकांनी घसरून १८,११३ चा बंददिला. Weak global cues and rising bond yields make the markets jittery.
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण.Market ends lower for the second day
सलग दुसऱ्या दिवशी बाजरात नफावसुली पाहावयास मिळाली.बाजार १%ने घसरला. बाजराची सुरुवात कमजोरीनेच झाली व दिवसभरात यात वाढ होत गेली सेन्सेक्स ७७७ अंकांनी घसरला. जागतिक बाजरातील कमजोरी,क्रूड ऑइलच्या किमतीत झालेली वाढ, बॉण्ड यील्ड मधील वाढ व पश्चिमी आशियाई देशातील तणाव तसेच विदेशी गुंतवणूकदारानी(FII) केलेली विक्री यामुळे बुधवारी पुन्हा एकदा बाजरात घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६५६ अंकांनी घसरून ६०,०९८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १७४ अंकांनी घसरून १८,९३८ चा बंददिला.
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण Bears tighten grip
सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी प्रचंड घसरण झाली. सेन्सेक्स ७७० अंकांनी घडगडला. जागतिक बाजारातील कमजोरी,विदेशी गुंतवणूकदारांची विक्री (selling by FIIs) व बॉण्ड यील्ड मध्ये झालेली वाढ याचा पुन्हा एकदा भारतीय बाजाराला फटका बसला. FMCG, IT आणि pharma क्षेत्रात मोठया प्रमाणात विक्री झाली.केंद्रीय अर्थसंकल्प( BUDGET 2022 ) सादर होण्याचा दिवस जवळ येत असल्याने मार्केट मध्ये चढ उताराचे प्रमाण वाढले होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६३४ अंकांनी घसरून ५९,४६४ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १८१ अंकांनी घसरून १७,७५७ चा बंददिला.
बाजारात घसरण सुरूच सेन्सेक्स ८०० अंकांनी गडगडला.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा बाजारात दबावाचे वातावरण होते. जागतिक बाजारातील कमजोरीमुळे भारतीय बाजार पुन्हा कोसळले. दिवसभारत सेन्सेक्स ८०० अंकांनी गडगडला. शेवटी बाजाराने रिकवर होण्याचा प्रयत्न केला. परंतु बाजार लाल निशाण फडकवूनच बंद झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४२७ अंकांनी घसरून ५९,०३७ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १३९अंकांनी घसरून १७,६१७ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)
ML/KA/PGB
22 Jan 2022