ऋषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार अपघातात गंभीर जखमी झालेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मुंबई येथील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात ऋषभच्या गुढग्यावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली.
त्याला विशेष वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखाखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ऋषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतची काळजी घेणार्या वैद्यकीय चमूतील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच अपघातात झालेल्या दुखापतींमुळे त्याला अजूनही वेदना होत असून त्याच्या भेटीसाठी गर्दी न करता त्याला विश्रांतीसाठी वेळ द्यावा, असेही ते म्हणाले.
SL/KA/SL
7 Jan 2023