सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी तेजी

 सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी तेजी

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नसराईची लगबग सुरू असताना सोने व चांदीचे भाव चांगलेच वधारले आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2600 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमची वृद्धी दिसून आली. तर चांदीत 6000 रुपये प्रत‍ि क‍िलो पेक्षा जास्त वाढ झाली. वायदे बाजारासह (MCX) सराफा बाजारात सोन्याने नवीन विक्रम रचला.

सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात  सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात एक हजारांची वाढ झाली असून चांदीच्या भावात अडीच हजार (Gold price hike 2022) रुपयांची वाढ झाली आहे.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,750 तर 24 कॅरेट साठी 53,180 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 636 रुपये आहे. (gold silver price update)
ध्या लग्नसराई (wedding news) सुरू आहे मात्र अचानक सोन्या चांदीच्या दारात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये (customers) नाराजी आहे. दर वाढल्याने अनेकांचे बजेट कोलमडले असून भावात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

SL/KA/SL

2 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *