कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे Right to Disconnect Bill लोकसभेत सादर

 कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे Right to Disconnect Bill लोकसभेत सादर

नवी दिल्ली, दि. ६ : ‘वर्क लाइफ बॅलन्स’ हा सध्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. कामाच्या अतिताणामुळे गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी प्राण गमावले आहेत. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल, कॉल्स यांचे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे मानसिक तणाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांची यातून सुटका व्हावी आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून ‘राइट टू डिस्कनेक्ट’ अधिकाराची जोरदार चर्चा होत होती. काल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच खासदार सुप्रिया सुळे यासंबंधीचे ‘राइट टू डिस्कनेक्ट’ विधेयक लोकसभेत मांडले.
सरकारमध्ये नसलेले लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार देखील महत्त्वाच्या विषयांवरचे विधेयक मांडू शकतात. सरकारने जर त्यावर गंभीरपणे विचार केला तर ते विधेयक अगदीच स्वीकारलेही जाते. सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या विधेयकात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे कि, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार मिळावा. जगभारतील तंत्रज्ञान्याचा प्रसार अधिक वाढल्यानंतर कामाचे तास संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांशी ई-मेल, मोबाइल किंवा मेसेजिंगद्वारे कामानंतरही संपर्क साधण्याची प्रवृत्ती कंपन्यांत दिवसेंदिवस अधिक वाढू लागली आहे.

याआधी ही २०१८ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘राइट टू डिस्कनेक्ट २०१८’ खासगी सदस्य विधेयक बिल म्हणून लोकसभेत मांडले होते. तेव्हाच्या विधेयकात असा प्रस्ताव होता की, कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेनंतर ई-मेल, कॉल किंवा मेसेजला उत्तर देणे बंधनकारक नसावे. तसेच कामानंतर संपर्क न करण्याचा हक्क देखील दिला जावा. परंतु हे विधेयक त्यावेळी संसदेत मंजूर होऊ शकले नाही. मात्र आता पुन्हा एकदा हे विधेयक सादर करण्यात आले आहे. शुक्रवारी सादर केलेल्या विधेयकात सुप्रिया सुळे यांनी कर्मचारी कल्याण प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद देखील नमूद केली आहे.

खासदार शशी थरूर यांनी आणखी एक खासगी विधेयक सादर करून सुप्रिया सुळे यांच्या विधेयकाला यावेळी पाठिंबा दिला आहे. त्यांनी “व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची सुधारणा, विधेयक, २०२५” (Occupational Safety, Health and Working Conditions Code (Amendment) Bill, 2025) हे विधेयक सादर केले गेले होते. या विधेयकात कामाचे मर्यादीत तास, डिस्कनेक्टचा अधिकार सुरक्षित करणे, तक्रार निवारण मंच आणि मानसिक आरोग्यासाठी सपोर्ट सिस्टिम सारख्या तरतुदी देखील या विधेयकात नमूद केल्या आहेत.

सततच्या कामाच्या संपर्कामुळे तसेच मानसिक आणि शारीरिक तणाव वाढीमुळे अनेकांना बऱ्याच गंभीर मानसिक आणि शारीरिक तणावातून जावे लागते. यावर उपाय म्हणून प्रथम युरोपमध्ये ‘राइट टू डिस्कनेक्ट’ या कल्पनेचा विचार झाला होता.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *