रिफायनरीच्या समर्थनार्थ भाजपचा मोर्चा…
रत्नागिरी, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज भाजप तर्फे राजापूर मध्ये मोर्चा काढण्यात आला. जवाहर चौकातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व आमदार नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार आदीं भाजप नेत्यांनी केले. यावेळी मोर्चाला संबोधित करताना भाजप नेत्यांनी रिफायनरीला विरोध करणाऱ्या उध्दव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. हा मोर्चा जवाहर चौक ते तहसीलदार कार्यालय असा काढण्यात आला. रिफायनरी समर्थकांच्या वतीने तहसीलदार शीतल जाधव यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आगामी काळात रिफायनरी समर्थनार्थ भाजप तर्फे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भव्य सभा घेण्यात येणार असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
ML/KA/PGB 6 May 2023