रेल्वे स्टेशनबाहेर प्रवाशांना स्वस्त तांदळासह होणार तांदुळ पिठाचाही पुरवठा

 रेल्वे स्टेशनबाहेर प्रवाशांना स्वस्त तांदळासह होणार तांदुळ पिठाचाही पुरवठा

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या महागाईच्या काळात घरातील पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया देखील नोकरी करून घरखर्चाचा भार उचलतात. मात्र या सोबतचे स्त्रीयांना गृहिणी म्हणून जबाबदारीही पार पाडायची असते. कामावरून थकून भागून घरी येतात त्या भाजीपाला आणि धान्य खरेदी करतात. आता रेल्वे बोर्डाने स्टेशन बाहेर तांदूळ आणि तांदूळ पीठ विक्रीला परवानगी दिल्याने स्त्रीयांना धान्य खरेदी करणे सोपे होणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात देशातील काही रेल्वे स्टेशनवर योजना राबविण्यात येणार आहे. तांदळासह पिठाची विक्री करण्यात येईल. तांदळासह पिठाची किंमत पण वाजवी असेल. रेल्वेने केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्रालयाच्या मदतीने हा निर्णय घेतला आहे. लवकरच देशातील काही रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्वस्त दरात प्रवाशांना तांदळासह पिठाचा पुरवठा करण्यात येईल.भारत आटा आणि भारत तांदूळ (Bharat Brand) हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने भारतात तांदळासह पिठाची विक्री सुरु केली आहे. भारत आट्याची किंमत 27.50 रुपये प्रति किलो आहे. तर भारत तांदळाचा भाव 29 रुपये किलो आहे. पिठासह तांदळाची विक्री रेल्वे स्टेशन बाहेर करण्याची योजना आहे.

रेल्वे बोर्डाने हा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला हा प्रकल्प केवळ तीन महिन्यांसाठी असेल. जर प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला. नियोजन चांगले झाल्यास ही योजना कायमस्वरुपी राबविण्याचा विचार आहे. या योजनेतंर्गत संबंधित रेल्वे स्टेशनवर, एक धान्याने भरलेली एक व्हॅन उभी असेल. या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी दोन तास स्वस्तात तांदळासह पिठाची विक्री करण्यात येईल. तांदळासह पिठाचा दर केंद्र सरकार निश्चित करणार आहे.

SL/ML/SL

7 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *