ठाण्यातील सात वर्षीय मुलाचा Solo Swimming मध्ये विश्वविक्रम
ठाणे, दि. १३ : ठाण्यातील सात वर्षीय रेयांश खामकर याने अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने पोहण्याचा अनुभव घेऊन लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले आहे, अशी माहिती महापौर कार्यालयाकडून देण्यात आली.
रेयांशने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मलापे जेट्टी ते विजयदुर्ग असा ३० किमी एकट्याने पोहण्याचा अनुभव घेऊन अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने पोहण्याचा अनुभव घेतला.
याआधी जून २०२५ मध्ये विजयदुर्ग समुद्रात सागरी जलतरणाची राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी दरम्यान जलतरण करायचे होते. हे अंतर जवळपास 15 किलोमिटरचे आहे. या स्पर्धेत देशभरातून 30 जलतरणपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा 8 वर्षांवरील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती.
रेयांशच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे असं त्याचे वडील दीपक खामकर यांनी सांगितलं. यासाठी तो नेहमीच मेहनत घेत होता. लहान वयात ही त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे त्याचे विशेष कौतूक आहे. भविष्यात त्याने ऑलिंपिकमध्ये देशासाठी ही मेडल जिंकावं, अशी इच्छा त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी तो आतापासूनच तयारी करत आहे. त्याची सुरूवात त्यांनी या स्पर्धेपासूनच केली आहे.