राष्ट्रीयकृत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात ठिय्या आंदोलन

मुंबई, दि ११ :
राष्ट्रीयकृत बँकेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी,कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी देशातील सर्व राज्याच्या राजधानी ठिकाणी एकाच दिवशी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन झाले.
ऑल इंडिया बँक पेन्शनर्स आणि रिटायरिज असोसिएशनच्या जनरल कौन्सिलच्या (एआयबीपीएआरसी)राज्यसचिव शेखर कदम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.आंदोलनात उपाध्यक्ष रवींद्र शेट्टी,चंद्रशेखर बारजगे, सुधीर पोवार त्यांच्यासह सेवानिवृत्त बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
महाराष्ट्रात राष्ट्रीयकृत बँकेचे सध्या सुमारे तीन लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.या बँके मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.गेल्या ३० वर्षापासून सेवानिवृत्त यांच्या पेन्शनमध्ये केंद्र सरकारने बदल केलेला नाही.पेन्शन अद्यावत करावी, ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसाठी विशेष भत्त्याची गणना करावी,परवडणारी आरोग्य विमा पॉलिसी केंद्रसरकारने द्यावी,१० वर्षानंतर कम्युटेशनची वसुली थांबवावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
सेवानिवृत्त यांच्या मागण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने मागण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा. या आंदोलनानंतर पुढील आंदोलन हे दिल्ली येथील जंतरमंतर याठिकाणी घेण्यात येणार आहे.यासाठी लवकरच बैठक घेऊन जंतर-मंतर वरील तारीख ठरविणार असल्याची माहिती पेन्शनर पदाधिकारी रवींद्र शेट्टी यांनी दिली. KK/ML/MS