रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
1/2 कप बासमती तुकडा तांदूळ1/2 कप मूग डाळ2 कांदे1 टोमॅटो1 टीस्पून गरम मसाला1 टीस्पून धने जीरे पूड2 टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे घेणे)6-7 कढीपत्ता पाने2 लाल तडका मिरची1 टीस्पून आलेलसूण पेस्ट1 टीस्पून मोहरी1 टीस्पून जीरे1 टीस्पून हळद1 टीस्पून हिंग2 टेबलस्पून तेल / तूपकोथिंबीर3-4 कप पाणी(आवश्यकतेनुसार पाणी घेणे)1-2 हिरवी मिरचीतडका देण्यासाठी…1 /2 टीस्पून मोहरी1/2 टीस्पून हिंग1 ब्याडगी मिरची2 टीस्पून तूप /तेल1/2 टीस्पून लाल तिखट1 टीस्पून लसूण तुकडे
प्रथम डाळ तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धून घेणे. कुकर मध्ये हे डाळ तांदूळ घालणे. त्या मध्ये जितके डाळ तांदूळ आहे त्याच्या तिप्पट पाणी घालणे (पाणी नेहमी पेक्षा जास्त घालणे) नंतर त्यात हळद, मीठ, हिंग घालून घेणे. झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्टी काढून घेणे.
एका प्लेट मध्ये कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घेणे. वाफ गेली कि कूकरचे झाकण काढून डाळ तांदूळ शिजले का ते पाहावे. एकदम मऊ आणि पातळ शिजवून घेणे.पाणी कमी असेल तर 1-2 कप पाणी घालून ते शिजलेले डाळ तांदूळ पातळ करून घेणे.व डावाने ते एकजीव करून घेणे.आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची याची खमंग फोडणी करून घेणे. आता त्या मध्ये कांदा, आले लसूण पेस्ट 2 मिनिटे परतून घेणे.
आता या मध्ये हळद, टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून घेणे. आता या मध्ये सगळे मसाले आवडीप्रमाणे घालून छान टोमॅटो मऊ होई पर्यंत परतून घेणे. आता या मध्ये हटून घेतलेली शिजलेली डाळ तांदूळ घालून सगळे एकजीव करून घेणे.ही खिचडी पातळच असते. तर गरज असेल तर पाणी घालावे.
या मध्ये भरपूर कोथिंबीर घालून झाकण ठेवून 5 मिनिटे खिचडी शिजवून घेणे. व वरून तूप घालून गॅस बंद करावा. खिचडी सर्व्ह करताना वरून तडका घालून घेणे. त्या साठी तडका पॅन मध्ये तूप किंवा तेल घालावे. व मोहरी, जीरे, हिंग, लसूण तुकडे, मिरची, लाल तिखट याचा तडका करून घेणे.मस्त रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तयार झाली. सोबत सॅलड, कैरी लोणचे सर्व्ह करावे. ही गरम गरम मऊ, लुसलुशीत, पातळ खिचडी खूप छान टेस्टी लागते.
ML/KA/PGB 3 Dec 2024