चोरी झालेल्या प्राचीन मूर्तींची जांब समर्थ इथे पुनर्स्थापना
जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिर संस्थानमधील चोरी गेलेल्या पुरातन मुर्तींचा नुकताच शोध लागला.पोलिसांनी हुडकून काढलेल्या या पुरातन मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी पार पडत आहे.Restoration of stolen ancient idols here at Jamba Samarth
या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे.दोन दिवसाच्या या भव्य सोहळ्याला संत, महंतांसह जिल्ह्यातील बहुतांशी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक तथा समर्थ मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी भूषण महारूद्र स्वामी महाराज यांनी दिली.
श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या प्राचीन मूर्ती काही दिवसांपूर्वी चोरी गेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करीत चोरट्यांना ताब्यात घेतले. शिवाय पुरातन मूर्तीचा शोध लावला. सर्व मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा घेण्यात येणार आहे. सोहळ्यास गुजरातमधील श्रीमत् शंकराचार्य द्वारकापीठ तथा धर्मसभा विद्वत्संघाचे अध्यक्ष ब्रम्हचारी निरंजनानंद, वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष रामेश्वर शास्त्री, जालन्याच्या , ताई महाराज, श्रीराम मंदिराचे श्री रामदास महाराज आचार्य अश्या संत महात्म्यांची उपस्थिती असणार आहे.
आज शुक्रवारी (ता. २५) सकाळी घनसावंगी पोलिस ठाण्यापासून सजवलेल्या वाहनातून मूर्ती कुंभार पिंपळगाव येथे आणण्यात येत आहे.यावेळी पायी दिंडी मिरवणुकीसह मूर्ती जांबसमर्थकडे रवाना होत आहेत.या मूर्ती गावात पोहचताच जांबसमर्थ गावातून मूर्तीची मिरवणुक काढण्यात येणार आहे.
दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान मूर्तीचे मंदिरात आगमन होईल त्यानंतर महाआरती होईल. दुपारी तीन ते पाच या वेळेत कृतज्ञता सोहळा तसेच सत्कार समारंभ होईल. सायंकाळी पाच ते सहा सांप्रदायिक उपासना तर रात्री नऊ ते अकरा बीड येथील मठपती ऋतुपर्णबुवा रामदासी यांचे कीर्तन होणार आहे.
शनिवारी (ता. २६) सकाळी सहा ते रात्री सात असे सलग तेरा तास त्रयोदशाक्षरी राममंत्र जप होणार आहे.उद्या शनिवारी सकाळी सहा वाजता मूर्तीस महाभिषेक, महापूजेसह विविध धार्मिक विधी होतील. सकाळी साडेसात दरम्यान पुनर्स्थापना विधी मुहूर्त आणि महाआरती होईल.
सकाळी साडेआठ ते साडेनऊ श्री मारुतीस रुद्राभिषेक तर सकाळी दहा ते साडेबारा दरम्यान पवमान स्वाहाकार आणि पूर्णाहुती व त्यानंतर आरती होईल. दुपारी साडेबाराला महाप्रसादाचा कार्यक्रम तर संध्याकाळी सहाला सांप्रदायिक उपासना त्यानंतर ग्रामस्थांच्या हस्ते आरती होऊन रात्री सात वाजता उत्सवाची सांगता होईल.
ML/KA/PGB
25 Nov .2022