नागपूर हिवाळी अधिवेशनात पुन्हा सीमा भागाचा ठराव
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूर इथे येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा ३० डिसेंबरपर्यंत कार्यक्रम आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरला, २८ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात २२,२३ तारखेला पुरवणी मागण्या मांडून त्यावर चर्चा करण्यात येईल असे आज नक्की करण्यात आले, लक्षावेधी सूचना अधिकाधिक घेऊन त्यावर अधिक चर्चा व्हावी यासाठी विशेष बैठका घेण्यात येणार आहेत.
सीमावसियांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन संपूर्ण सरकार आणि राज्य त्यांच्यामागे मागे ठामपणे उभे आहेत हे दर्शविणारा ठराव दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री मांडणार आहेत
मराठवाडा मुक्ती संग्रामाला ही ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने एका सर्व पक्षीय गटनेता बैठकीचे आयोजन अधिवेशन काळात करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष ऍड राहूल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कामकाज समितीच्या दोन स्वतंत्र बैठका आज घेण्यात आल्या.
ML/KA/SL
13 Dec. 2022