‘रेशीम विभाग आपल्या दारी’ अभियानातून रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन…

वाशीम दि ८:– रेशीम संचालनालय, नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, वाशीम मार्फत यंदा ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ हे विशेष अभियान १ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. संचालक विनय मून यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात होत असून मागील दोन वर्षांपूर्वी नोंदणी करूनही काही कारणास्तव तुती लागवड किंवा रेशीम उद्योग सुरू न केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहितीपत्रके दिली जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी तुती लागवड का केली नाही याबाबत अभिप्राय घेण्यात येणार आहे.
जिल्हा रेशीम कार्यालय, वाशीम मार्फत रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविली जात आहे. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना ग्रामसभेच्या संमतीने सहभागी करून घेण्यात येणार आहे. अर्ज ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातून करता येतील. प्रति एकर रु. ५०० नोंदणी शुल्क जमा करावे लागेल. मनरेगा अंतर्गत लागवडीच्या देखभालीसाठी व संगोपन गृह बांधकामासाठी मिळून शेतकऱ्यांना तीन वर्षांत तब्बल रु. ४ लक्ष ३२ हजार २४० इतका निधी उपलब्ध होणार आहे.ML/ML/MS